स्वतःची तुलना करणं थांबवा — तुमचा प्रवास वेगळा आहे.

आज सोशल मीडियाच्या काळात तुलना करणं खूप सोपं झालं आहे.

आपण रोज सकाळी उठतो, सोशल मीडिया पाहतो ,इतरांचे आनंदाचे क्षण, यश,

हे सगळ चांगलं दिसत ,आणि आपण अस्वस्थ होतो.

कोणाचं career पुढे आहे,
कोणाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं,
कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त यशस्वी वाटतं.

आणि नकळत आपण स्वतःकडे पाहायला विसरतो.

“मी अजून तिथे पोहोचलो नाही…”
“मी का इतका मागे आहे?”
असे विचार मनात सतत फिरत राहतात.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा —
प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो.

प्रत्येकाच मेहनतीचे यश वेगळे आहे.
प्रत्येकाचे प्रयत्न वेगळे आहेत.

आज आपण समजून घेऊया
स्वतःची तुलना करणं का नुकसानकारक आहे
आणि ते कसं थांबवायचं.


🔹 आपण स्वतःची तुलना का करतो?

तुलना करणं ही मानवी स्वभावाची नैसर्गिक गोष्ट आहे.
पण ती जास्त झाली की मन अस्वस्थ होतं.

• सोशल मीडियाचा प्रभाव
आपल्याला फक्त इतरांचं “best version” दिसतं.
त्यामागची मेहनत,लागलेला वेळ त्याचा संघर्षाचा भाग दिसत नाही.

• स्वतःबद्दल कमी आत्मविश्वास
जेव्हा आपण स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवत नाही,
तेव्हा इतरांशी तुलना सुरू होते.

• लहानपणापासूनची सवय
“पहा, तो किती चांगला आहे…”
असं ऐकत मोठे झालो की तुलना मनात बसते.

• परिपूर्ण होण्याची अपेक्षा
सगळं पटकन मिळायला हवं —

जे मिळत आहे ते आणि जे पाहिजे ते सगळ
परिपूर्ण असायला हवं,हा अट्टाहास जे आहे
त्याकडे लक्ष देऊ देत नाही.ही घाई आपल्याला अस्वस्थ करते.

पण लक्षात ठेवा —
तुलना तुमची प्रगती थांबवते.


🔹 स्वतःची तुलना करणं कसं थांबवायचं? (5 सोपे मार्ग)

तुलना पूर्णपणे थांबवणं कठीण आहे,
पण ती कमी करणं शक्य आहे.

1️⃣ तुमचा स्वतःचा प्रवास लिहून ठेवा

तुम्ही आतापर्यंत काय शिकलात, काय मिळवलं —
हे लिहा.
इतरांशी नाही, काल तुम्ही जे होतात त्या स्वतःशी तुलना करा.


2️⃣ सोशल मीडिया वापर मर्यादित ठेवा

दररोज किती वेळ घालवता ते पाहा.
जास्त तुलना वाटत असेल तर थोडा ब्रेक घ्या.


3️⃣ कृतज्ञतेची सवय लावा

दररोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात.
हे मनाला स्थिर ठेवतं.


4️⃣ तुमच्या ताकदी ओळखा

प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतं.
तुमच्यातील गुण लिहून काढा.


5️⃣ स्वतःशी नम्रपणे बोला

“मी पुरेसा नाही” ऐवजी
“मी शिकतोय, वाढतोय” असं स्वतःला सांगा.


🌿 शेवटचा महत्त्वाचा संदेश

स्वतःची तुलना करणं ही सवय आहे —
पण ती बदलणं तुमच्या हातात आहे.

लक्षात ठेवा,
इतरांचा वेग वेगळा आहे,
त्यांची परिस्थिती वेगळी आहे,
आणि त्यांचा प्रवासही वेगळाच आहे.

तुमचा मार्ग तुमच्यासाठी तयार झाला आहे.
तुमचं यश तुमच्या वेळेनुसार येईल.

स्वतःची तुलना करणं थांबवल्यावरच
मन हलकं होतं.

आजपासून एक निर्णय घ्या —
इतरांशी तुलना नाही,
तर कालच्या स्वतःशी प्रगतीची तुलना करा.

कारण शेवटी,
तुम्ही अपुरे नाही…
तुम्ही प्रगतीच्या प्रक्रियेत आहात.

आणि तोच सर्वात महत्त्वाचा भाग आहे.


मन शांत ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी आमचा हा लेख नक्की वाचा —
👉 मन शांत ठेवण्यासाठी रोज करा हे 5 छोटे सरावhttps://maymarathi.com/satat-overthinking-ka-hote/

जर तुम्हालाही स्वतःची तुलना करणं थांबवायचं असेल, तर हा लेख शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Comment