स्वतःची किंमत कशी ओळखावी? स्वतःवर प्रेम करायला शिकणं.
थांबा… एक क्षण स्वतःसाठी.
कदाचित आज तुम्हालाच तुमच्या शब्दांची गरज आहे.
कधी असं वाटतं का की आपण इतरांसाठी खूप करतो,
पण स्वतःसाठी काहीच नाही?
लोक काय म्हणतील याचा विचार करत करत
आपण स्वतःच्या भावना बाजूला ठेवतो.
हळूहळू स्वतःची किंमत विसरायला लागतो.
इतरांसाठी केलेल्या गोष्टींची कधी
दखल घेतली जाते,किंवा कधी नाही.
पण जेव्हा अपेक्षित काही गोष्टी होत
नाहीत, तेंव्हा सगळ निर्थक वाटू लागत.
आज अनेक लोक बाहेरून ठीक दिसतात,
पण आतून खूप थकलेले असतात.
या लेखात आपण समजून घेणार आहोत —
स्वतःची किंमत कशी ओळखायची
आणि स्वतःवर प्रेम कसं करायचं.
🔹 स्वतःची किंमत कमी का वाटायला लागते?
“स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नाही —
ते स्वतःची काळजी घेणं आहे.”
कधी कधी आपण नकळत स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू लागतो.
आपण कोण आहोत?आपल्याला काय पाहिजे?
हे असे अनेक प्रश्न उपस्थितीत होतात,
या प्रश्नांच्या गोंधळात आपण स्वतःला विसरतो आणि
तिथून मग आपण सगळ्यापेक्षा मागे आहोत याची जाणीव होते.
यामागे काही सामान्य कारणं असतात:
• सतत तुलना करणे
इतरांचं आयुष्य पाहून आपण आपली तुलना करतो.
• स्वतःकडे दुर्लक्ष
सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःची नाही.
• भूतकाळातील अनुभव
जुन्या अपयशामुळे मनात शंका निर्माण होते.
• लोकांना खुश ठेवण्याची सवय
स्वतःच्या भावनांपेक्षा इतरांना प्राधान्य देतो.
या सगळ्यात आपण स्वतःला वेळ देऊन,स्वतःशी प्रामाणिकपणे
बोलून ,काही दिवस सोशल मीडिया बंद करून ,आपल्या आतला
आवाज, या सगळ्यांवर लक्ष देत नाहीत,आणि आपली किंमत
काहीच नाही हे मनात घर करून राहत.
हळूहळू हे सगळं मिळून आपली स्वतःची किंमत कमी वाटायला लागते.
🔹 स्वतःची किंमत ओळखण्यासाठी 5 सोपे मार्ग
स्वतःवर प्रेम करायला शिकणं म्हणजे मोठे बदल नाहीत —
छोट्या सवयींची सुरुवात आहे.
1️⃣ स्वतःशी प्रामाणिक रहा
आपल्या भावना दाबून ठेवू नका.
जे वाटतं ते स्वीकारा.जे वाटत ते बोला.
संवाद नेहमी माणसाला
मनातून हलका करत असतो.
स्वतःला समजून घेणं हेच पहिलं पाऊल आहे.
2️⃣ “नाही” म्हणायला शिका
सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नसतं.
सगळ्यांना वेळ देत,आनंद देत,आपण
स्वतःकडे दुर्लक्ष करतो.
जे स्वतःला योग्य वाटत नाही त्याला
नाही म्हणता यायला हवं.
कधी कधी स्वतःसाठी “नाही” म्हणणं गरजेचं असतं.
3️⃣ स्वतःसाठी वेळ काढा
आयुष्यातल्या इतक्या गोंधळात आपण
स्वतःसाठी वेळ काढत नाही.
मनात विचारांनी नकारात्मकतेने
जितके आपण पोकळ होतो,त्यात
स्वतःला विसरतो.
10 मिनिटे चाला,जे आवडत ते करा,
आपले छंद जोपासा.दररोज किमान 15 मिनिटे स्वतःसोबत घालवा.
शांत बसणं, चालणं, लिहिणं — जे आवडेल ते करा.
4️⃣ तुमच्या छोट्या यशांची नोंद ठेवा
मोठं यश येईपर्यंत थांबू नका.
दररोज केलेल्या छोट्या गोष्टी लिहून ठेवा.
5️⃣ स्वतःशी प्रेमाने बोला
“मी पुरेसा नाही”
याऐवजी
“मी शिकतोय, वाढतोय” असं स्वतःला सांगा.
शब्द मनावर खोल परिणाम करतात.
🔹 आजपासून एक छोटा सराव
आजपासून रोज फक्त 5 मिनिटे स्वतःसाठी ठेवा.
रात्री झोपण्याआधी शांत जागी बसा
आणि स्वतःला तीन प्रश्न विचारा:
1. आज मी काय केलं, जे पूर्णपणे वाईट नव्हतं?
ते फार मोठं असायलाच हवं असं नाही —
फक्त खरं असावं.
2. आज मला स्वतःबद्दल कशाचा अभिमान वाटतो?
छोटी गोष्ट असली तरी चालेल.
3. उद्या मी स्वतःसाठी एक छोटं काय करणार?
हे सगळं कागदावर लिहा.
लिहिल्यावर मन हलकं होतं
आणि स्वतःशी संवाद सुरू होतो.
सुरुवातीला कदाचित अवघड वाटेल,
पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल —
तुम्ही स्वतःला जास्त समजू लागलात.
हा छोटा सराव रोज केला तर
स्वतःची किंमत हळूहळू लक्षात यायला लागते.
अश्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या
आत्मविश्वासावर, overthinking वर
काम करायचं असेल तर
आमचे लेख नक्की वाचा….
आत्मविश्वास कमी वाटतो का? https://maymarathi.com/aatmavishwas-kami-vatto/
सतत overthinking मुळे…https://maymarathi.com/satat-overthinking-ka-hote/
जर हा लेख तुम्हाला थोडाही उपयोगी वाटला असेल,
तर तो कोणासोबत share करा.
कदाचित तुमचा एक share
कोणाचं मन हलकं करू शकेल 🤍.