maymarathi.com

Truth of Social Media, प्रायव्हसी, पर्सनल लाईफ या बद्दल काय म्हणाली रिंकू राजगुरू?

Social Media, प्रायव्हसी, पर्सनल लाईफ या बद्दल काय म्हणाली रिंकू राजगुरू?

हल्ली सगळेच social Media, पर्सनल लाईफ या बद्दल काहीतरी नियम असावेत अस बोल जात आहे.अभिनेता अभिनेत्री यांच्या खाजगी आयुष्याबद्दल माहिती नसताना ही उगाच बातम्या पसरवल्या जातात.या बद्दल बऱ्याच सेलिब्रिटीनि खंत व्यक्त केलेली पाहत आहोत.

सध्या आशा आणि आगामी साडे माडे 3 या चित्रपटाच्या प्रमोशन साठी रिंकू राजगुरू आपल्याला चर्चेत दिसत आहे.मागच्या डिसेंबर मध्ये रिंकूचा आशा चित्रपट येऊन गेला.याच प्रमोशन दरम्यान तिने मित्र म्हणे या यूट्यूब चॅनेला मुलाखत दिलेली आहे.त्यात social Media, प्रायव्हसी, पर्सनल लाईफ या बद्दल रिंकू बोलतांना दिसत आहे.

सैराट चित्रपट येऊन इतके वर्ष उलटली परंतु आज ही रिंकूला आर्ची म्हणून सगळे लक्षात ठेवतात.याच पार्श्वभूमीवर रिंकू ला काही प्रश्न विचारण्यात आले.

रिंकू च्या 10 वीचा निकाल जेव्हा tv माध्यमात दाखवण्यात आला,त्यावर रिंकू ने social Media, प्रायव्हसी, पर्सनल लाईफ यावर भाष्य केलं आहे.प्रत्येकाला ज्याची त्याची प्रायव्हसी असते आणि मीडिया न माहिती नसताना बातमी दिल्यावर किती मनस्ताप होतो त्यामुळे मिडियान पर्सनल लाईफ बद्दल आधी सेलिब्रिटीला विचारावं की हे खर आहे का त्या नंतर मग ती बातमी करावी.

रिंकू पुढे हे ही सांगते की सैराट च यश खूप मोठ आहे .उद्या मी जर मेले तर लोक मला रिंकू गेली अस नाहीतर आर्ची गेली अस म्हणतील.सैराट च्या यशानं सगळ जरी मिळालं असल तरी रिंकू च्या आयुष्यात तिला शाळा,शाळेतील मित्र हे सगळ अनुभवता आलेलं नाही अशी खंत ती व्यक्त करते.

मित्र म्हणे या यूट्यूब चॅनला दिलेल्या मुलाखतीत रिंकू म्हणते की मिडियाला सुद्धा काही मर्यादा असाव्यात ज्याने कोणाच्याही प्रायव्हेट लाइफ वर वाईट परिणाम होणार नाही.

आता आगामी रिंकूच्या पुन्हा एकदा साडे माडे 3 या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती सगळ्या टीम सोबत दिसत आहे.

Rohini
Exit mobile version