maymarathi.com

मेमरी लेन 2016, म्हणत दिग्गज मराठी अभिनेत्रीची जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा.स्पृहा जोशी ते आर्या आंबेकर पहा कोणी कोणी शेअर केलेत फोटो.

मेमरी लेन 2016

मेमरी लेन 2016, म्हणत दिग्गज मराठी अभिनेत्रीची जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा.स्पृहा जोशी ते आर्या आंबेकर पहा कोणी कोणी शेअर केलेत फोटो.

सोशल मीडियावर सध्या 2026 वर्ष 2016 सारखच आहे अस म्हणत मराठीतील दिग्गज अभिनेत्रींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सोशल मीडिया सध्या नवीन ट्रेंड नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो.एकदा ट्रेंड सेट झाला की बऱ्याच जणांना आपण ही त्यात सहभागी व्हाव याचा मोह सुटत नाही.सध्या 2026 हे वर्ष 2016 सारखं आहे अस सगळीकडे म्हणल्या जात आहे. त्यात बऱ्याच मराठी अभिनेत्रीने मेमरी लेन म्हणत आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

स्पृहा जोशी ते आर्या आंबेकर या सगळ्यांना या ट्रेंड ची भुरळ पडलेली दिसत आहे. throwback 2016 म्हणत सगळे आपले फोटो शेअर करताना आपण पाहत आहोत.

आर्या आंबेकर ने 2016 साली ती सध्या काय करते? या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होत.ज्यात तिने निभावलेली तन्वीची भूमिका आज ही सगळ्यांच्या लक्षात आहे.
आर्या आंबेकर बरोबर अभिनय बेर्डे ने सुद्धा मराठी चित्रपटात पदार्पण केलं होत. आर्याने तिचा इंस्टाग्रामवर सोशल हॅण्डल वरून ती सध्या काय करते? च्या सेटवरचे फोटो शेअर केले आहेत.

आर्याबरोबरच आपल्या अभिनयाबरोबर जिच्या कविता ही सगळ्यांना आवडतात अशी स्पृहा जोशीने सुद्धा 2016 मेमरी लेन म्हणत बरेच फोटो शेअर केलेले आपण पाहत आहोत.
स्पृहा तिच्या  अभिनयासोबत कधी कविता,गीतकार तसेच सूत्रसंचालनाच्या भूमिकेत आपल्याला दिसते.

स्पृहा ने तिच्या 2016 चे 13 फोटो शेअर केले असून त्या प्रत्येक फोटोबद्दल कॅपेशन मध्ये त्याच विशेषत्व लिहिल आहे.

आर्या,स्पृहा तसेच मयुरी वाघ ने सुद्धा तिचे 2016 चे फोटो शेअर केले आहेत.अस्मिता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी वाघ.

त्याचबरोबर मयुरी देशमुख ने सुद्धा तिच्या 2016 ला मिळालेल्या पहिल्या मालिकेचे फोटो शेअर केले आहेत. खुलता कळी खुलेना ही मयुरी ची मालिका झी मराठी वर आपण पाहत होतो.मयुरी अभिनयासोबतच शायरी,लेखक म्हणून ही चित्रपट क्षेत्रात काम करत आहे.

Rohini
Exit mobile version