अर्धांगिनी म्हणत विशाल निकम ने दाखवला त्याच्या सौंदर्याचा चेहरा.
अर्धांगिनी म्हणत विशाल निकम ने दाखवला त्याच्या सौंदर्याचा चेहरा.बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम ने माझी अर्धांगिनी म्हणत त्याच्या सौंदर्याचा चेहरा दाखवला आहे.सध्या सगळीकडे लग्नसराई चालू आहे.मागच्या वर्षी प्रमाणेच या वर्षी सुद्धा बरेच मराठी जोडी लग्नबंधनात अडकणार आहेत.
आता नुकतेच याड लागलं प्रेमाच मालिकेत दिसणारा विशाल निकमने त्याच्या सौंदर्याचा चेहरा सगळ्यांना दाखवला आहे.
माझी सौंदर्या म्हणत बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम याची प्रेमाची कबुली.
विशाल निकमची माझी सौंदर्या म्हणत पोस्ट…
आपल्या सगळ्यांना माहीत आहे मागच्या काही दिवसांपासून विशाल निकम ने एक व्हिडिओ शेअर केला होता,ज्यात माझी सौंदर्या म्हणत एक मुलगी सोबत असलेले फोटो शेअर करण्यात आले होते.त्यात तिचा चेहरा दिसत नसला तरी सगळ्यांनी ती अभिनेत्री अक्षया हिंदळकर आहे असे तर्क लावले होते.जे आता खरे होताना पाहत आहोत.
बिग बॉस मराठी 3 पासून विशालची गर्लफ्रेंड कोण ही चर्चा..
अर्धांगिनी म्हणत विशालने नुकतच त्याच्या सौंदर्याचा चेहरा दाखवला आहे.खरंतर ही चर्चा रंगली ती बिग बॉस मराठी 3 च्या सीझन पासून.विशाल ने अनेकदा बिग बॉस मध्ये माझी सौंदर्या म्हणत उल्लेख केलेला दिसतो. बऱ्याच वेळानंतर आता त्याने तिचा चेहरा दाखवला आहे.
विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांच्या प्रेमाची सुरुवात..
स्टार प्रवाह वाहिनीवर विशाल आणि अक्षया यांनी साता जन्माच्या गाठी ही मालिका केली होती. तेव्हापासून ही जोडी सतत चर्चेत होती.आता अर्धांगिनी तसेच विशालची सौंदर्या म्हणत विशाल ने अक्षया हिंदळकर ची निवड केलेली दिसत आहे.
अक्षया हिंदळकर च्या कामाबद्दल बोलायचं असेल तर ती शेवटची आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली या मालिकेत दिसली होती.त्याच बरोबर तिने झी मराठीवर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत लीड रोल केला होता.2025 मध्ये अक्षया हिंदळकर चा एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.ज्यात ती अंकुश चौधरी सोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. पी एस आय अर्जुन अस चित्रपटाच नाव आहे.
बिगबॉस मराठी 3 चा विजेता झाल्या नंतर विशाल आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला आहे.त्याच्या बऱ्याच मालिका गाजलेल्या असून त्याने चित्रपटात सुद्धा काम केलं आहे.बिग बॉस मराठी 3 मध्ये विशाल सोबत आपण सोनाली पाटील, मीनल शहा, विकास पाटील,जय दुधाणे या सगळ्यांना सुद्धा पहिलं होत.
