कुरुळे ब्रदर्स यांच्या नो एन्ट्री आयुष्यात एन्ट्री घेऊन येत आहे ती !रतन चंदन मदन बबन आणि ती? पुन्हा एकदा साडे माडे 3.

कुरुळे ब्रदर्स, गॅरेज आणि नो मॅरेज लोच्या.पण यात आता ट्विस्ट घेऊन ती म्हणून सैराट फेम रिंकू राजगुरू येत आहे,पुन्हा एकदा साडे माडे 3 घेऊन.आपल्या सगळ्यांना माहीत आहे 2006 साली प्रदर्शित झालेल्या साडे माडे 3,ज्यात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांची मुख्य भूमिका होती.
ज्यात रतन म्हणून अशोक सराफ हे मोठ्या भावाच्या भूमिकेत तर चंदन म्हणून भरत जाधव आणि मदन म्हणून मकरंद अनासपुरे हे दोघेजण लहान भावाच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते.
आता पुन्हा एकदा साडे माडे 3 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.ज्यात ती म्हणून सैराट फेम रिंकू राजगुरू आपल्याला पाहायला भेटत आहे.बबन म्हणून सिद्धार्थ जाधव दिसत आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलर वरून सगळ्यांची कॉमेडी आणि रिंकुचा गोड अंदाज मनाला भावत आहे.येत्या 30 जानेवारी 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा साडे माडे 3 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.पुन्हा एकदा साडे माडे 3 या चित्रपटाच दिग्दर्शक अंकुश चौधरी आणि सचित पाटील यांनी केलं आहे.पहिल्या चित्रपटात आपल्याला अमृता खानविलकर सुद्धा पाहायला मिळाली होती.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आशा या चित्रपटात रिंकू मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती.ज्यात तिने मालती ही आशा वर्कर यांची संघर्ष कहाणी मांडली आहे.आशा या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे.